रामेती नागपूर
प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) नागपूर पूर्वी मृद संधारण प्रशिक्षण संस्था (Soil Conservation Training Institute) म्हणून ओळखली जात होती. ही संस्था 1 जुलै 1984 रोजी प्रादेशिक स्तरावर कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मृद व जलसंधारणाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. कृषी विभागाच्या एक खिडकी प्रणालीमध्ये पुनर्रचना करताना, त्यास अधिक शेतकरीभिमुख बनविण्यासाठी आणि सर्व विषयांचा समावेश करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने मृद संधारण प्रशिक्षण संस्थेचे प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (RAMETI) नागपूरमध्ये रुपांतरण केले व अशा प्रकारे रामेतीचा जन्म झाला. ही संस्था सन 2001 पासुन वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) या शिखर संस्थेशी संलग्न आहे. ही संस्था संत्रानगरी नागपूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि कृषी महाविद्यालय नागपूर, नागपूर विद्यापीठ आणि इतर शासकीय संस्थांच्या जवळ आहे. संस्थेची इमारत अतिशय शांत आणि हिरव्यागार परिसरात वसलेली आहे.
प्राचार्य रामेती यांचा संदेश
"रामेती, नागपूर येथे प्रक्षेत्रावर कार्यरत कृषि कर्मचा-यांना त्यांच्या गरजांनुसार प्रशिक्षण दिले जाते. बदलत्या हवामानामुळे समोर आलेल्या आव्हानांना सामोरे जाण्याकरीता आवश्यक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचावे हा प्रशिक्षणांचा मुख्य उद्येश आहे."
डॉ.विद्या मानकर
प्राचार्या, रामेती नागपूर