Translate to :  

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

वनामती विषयी

वनामती या प्रशिक्षण संस्थेची स्थापना १ जुलै १९९२ रोजी झाली. हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याच्या कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेस त्यांचे नाव देण्यात आले. कृषि विभागाची ही अग्रणी संस्था, व्ही. आय. पी. रोड, धरमपेठ, नागपूर येथे आहे. २ हेक्टर क्षेत्रावर असलेल्या या प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात प्रशासकीय /प्रशिक्षण भवन, वर्षा वसतीगृह व वसंतराव नाईक स्मृती सभागृह इ. इमारती आहेत.

वनामती अंतर्गत प्रादेशिक स्तरावर नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, ठाणे, खोपोली या सात ठिकाणी प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था आहेत.

वनामती व संलग्न प्रादेशिक प्रशिक्षण संस्थाद्वारे पुढील प्रमाणे विविध विषयांवर कृषि विभागातील अधिकारी व कर्मचात्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येतात.

कृषि विस्तार व्यवस्थापन

मनुष्यबळ विकास

माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान

नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन

शेतकरी उत्पादक कंपनीची क्षमता बांधणी

कृषि व्यवसाय व्यवस्थापन

मुल्य साखळी विकास

तसेच मा. बाळासाहेब ठाकरे, कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत अधिकारी कर्मचारी व FPO यांचे क्षमता बांधणी साठीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येते.

कृषि व्यतिरिक्त राज्य प्रशिक्षण धोरण, एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम, या अंतर्गतचे पायाभूत, उजळणी व पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण संबंधित अधिकारी वर्गासाठी नियमितपणे आयोजित करण्यात येतात.

आपले प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी अनुषंगीक क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांसोवत शैक्षणिक स्वरूपाचे सामंजस्य करार केले आहेत.