वनामती विषयी
-
वनामती या प्रशिक्षण संस्थेची स्थापना १ जुलै १९९२ रोजी झाली.
हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक यांनी कृषि क्षेत्रात
केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याच्या कृषि विस्तार
व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेस त्यांचे नाव देण्यात आले. कृषि विभागाची
ही अग्रणी संस्था, व्ही. आय. पी. रोड, धरमपेठ, नागपूर येथे आहे. २
हेक्टर क्षेत्रावर असलेल्या या प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात प्रशासकीय
/प्रशिक्षण भवन, वर्षा वसतीगृह व वसंतराव नाईक स्मृती सभागृह इ. इमारती
आहेत.
View More
आमचा दृष्टिकोन
- केंद्र आणि राज्य शासनाच्या पुरस्कृत कृषी विकासाच्या योजना आणि कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कृषी विभागात विस्तार कार्यकर्त्यांची क्षमता विकसित करणे व उत्तम शेतीसाठी उत्कृष्ट मनुष्यबळ निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
- माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर कृषी विस्तार व्यावास्थापनाथ करून तांत्रिक द्रुष्ट्या सक्षम मनुष्यबळ विकसीत करणे
- ग्रामीण महिलांचे कृषी क्षेत्रातील योगदान वाढविण्यासाठी विवीध कार्यक्रमांद्वारे सक्षमीकरण करणे व त्यांना मुख्य प्रवाहात आणने हे आमचे ध्येय आहे.
आमची उद्दिष्टे
- कृषी धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यातील कृषी विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या क्षमता वाढीसाठी अद्वितीय प्रशिक्षण संस्था बनणे आहे.
- राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत प्रशासनातील विविध संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षण प्रदान करणे.
- राज्यशासनाद्वारे राबविण्यात येणारे विविध प्रकल्प व कार्यक्रमांचे निरीक्षण आणि मूल्यमापन करणे.
- कृषी विभागातील कर्मचारी यांचे मार्फत कृषी विस्तार आणि व्यवस्थापन कार्य यशस्वीपणे होण्याकरिता शिक्षण आणि प्रशिक्षणाचे केंद्र बनणे.
मान्यवर
मा. श्रीमती. जयश्री भोज, भा.प्र.से
सचिव, कृषि
श्री. रविंद्र बिनवडे, भा.प्र.से.
आयुक्त, कृषि
श्रीमती वसुमना पंत, भा.प्र.से.
संचालक, वनामती