Translate to :  

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

प्रशासकीय भवन

मा. महासंचालक यांचे दालन व वरिष्ठ अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यालय.



प्रशासकीय भवन

मा. महासंचालक यांचे दालन व वरिष्ठ अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यालय.

प्रशिक्षण कक्ष

प्रत्येकी ४० आसनी क्षमता असलेले ४ प्रशिक्षण कक्ष आहेत. प्रत्येक प्रशिक्षण कक्षासोबतच ६ ते ८ आसनी तीन गट चर्चा कक्ष आहेत.

सेमिनार हॉल

सुमारे १६० आसन क्षमता असलेले वातानुकूलित “चिंतन सभागृह” असून त्यात सीसीटीव्ही व प्रशिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत.

योगाकक्ष

प्रशिक्षणार्थ्याँकरिता योग आणि ध्यानासाठी सुमारे १५० आसनी प्रशस्त सभागृह आहे.

ग्रंथालय

प्रशिक्षणार्थ्याँकरिता सुसज्ज असे ग्रंथालय आहे त्यात शेतीविषयक, कृषी-उद्योजक, विपणन, मानवी संसाधने, ग्रामीण विकास,माहिती तंत्रज्ञान व स्पर्धा परीक्षा ई. विषयावर पुस्तके उपलब्ध आहेत.

संगणक कक्ष

संस्थेत एकूण तीन संगणक कक्ष असून त्यात ८० संगणक इंटरनेट सुविधा व LFD पॅनेल सह उपलब्ध आहेत.

खोल्या प्रशिक्षणार्थी साठी

प्रशिक्षणार्थीना राहण्याकरिता प्रती खोली २ प्रशिक्षणार्थी या प्रमाणे ५० खोल्या असून १०० प्रशिक्षणार्थी राहण्याची व्यवस्था आहे.

भोजन कक्ष

एकाच वेळी सुमारे १०० प्रशिक्षणार्थ्याँकरिता भोजन घेण्याची सुविधा आहे.

व्यायाम शाळा

अत्याधुनिक अशी एक व्यायाम शाळा उपलब्ध आहे.

सभागृहा

३१७ व्यक्तीची आसन व्यवस्था असलेले स्व. वसंतराव नाईक स्मृती सभागृह.

इतर सोयीसुविधा

मनोरंजन कक्ष, अति महत्वाच्या व्यक्ति करिता ४ विशेष कक्ष उपलब्ध आहेत तसेच पर्याप्त वाहनतळ उपलब्ध आहे.