कृषि निविष्ठा विक्रेते धारकांकरीता कृषि विस्तार सेवा अभ्यासक्रम (DAESI)
कृषि निविष्ठा विक्रेते धारकांकरीता कृषि विस्तार सेवा अभ्यासक्रम (DAESI)
प्रशिक्षणार्थींचे मनोगत
रामेती, नागपूर येथे DAESI अभ्याक्रमाला सुरुवात केली तेव्हापासून मी प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांच्या आधुनिक शेतीला भेटी देऊन नविन माहिती जाणून घेतली. या अभ्यासक्रमांत नवीन किडीं विषयी माहिती, औषधाचे प्रमाण किती असायला पाहिजे? खर्चात बचत कशी करता येईल? तसेच शेतीविषयक जोडधंदा, विविध शासकीय योजनांची विस्तृत माहिती मिळाली.
शेतातील तण नियोजन, फवारणी करतांना पंप चालकाने घ्यावयाची खबरदारी, हवामान आधारित क्षेत्रानुसार पिकाचे नियोन, शेतकऱ्यांना येणाया नवनवीन अडचणींवर तोडगा काढणे, माती परीक्षणासाठी मातीचा योग्य पदधतीने नमुना घेणे, बीज प्रक्रिया, पेरणी ते कापणी पर्यंत संपूर्ण माहिती मिळाली. कोणत्या कीटकनाशकांमध्ये कोणती कीटकनाशके मिसळू नये याबाबत सविस्तर माहिती मिळाली.
एकूणच DAESI अभ्याक्रमातून घेतलेले संपूर्ण ज्ञान कृषि सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम मी अविरत सुरु ठेवले आहे. त्यामुळे माझा व्यवसाय भरभराटीला आला व शेतकऱ्यांना सुदधा त्याचा लाभ झाला