Translate to :  

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

घरच्या सोयाबीन पासून मिळावा सुदृढ आरोग्य

                            

आपल्याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन चे पिक घेतात परंतु आहारात मात्र सोयाबीन चा समावेश अगदीच नगण्य. सोयाबीन मध्ये असलेले उच्च प्रतीचे प्रथिने, उत्तम पोषण व औषधी मुल्य आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करते. त्यामुळे त्याला सोनबीज असे ही म्हणतात.

१०० ग्राम सोयाबीन मध्ये प्रथिने ४०-४२ टक्के, कॅलारी ४३२ कि.कॅ, कॅल्शियम २४० मि.ग्र., फॉस्फरस ६९० मी.ग्र., लोह १०.४ मीग्र., तंतुमय पदार्थ ३.९ मीग्र., जीवनसत्वे केरोटीन ४२६ मि. ग्र., जीवनसत्व ब संयुगे चांगल्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सोयाबीन हे कुपोषण निर्मुलन, दात व हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. हृदयरोगी व मधुमेही व्यक्तीसाठी उत्तम आहार, लाक्टोज अलर्जी साठी उत्तम पर्याय, स्त्रियांमध्ये वयापरत्वे होणारया त्रासासाठी सहाय्यक ठरते. असे आरोग्यदायी लाभ सोयबीन पासून मिळतात.

आहार शिफारशीनुसार व्यक्तीला १ ग्राम प्रति किलो याप्रमाणे प्रथिनांची आवश्यकता असते सोयाबीन च्या तुलनेत इतर प्रथिनयुक्त अन्न्पादार्थातून मिळणारे प्रथिने डाळवर्गीय (२२%), शेंगदाणे (२४%), दुध (४%), अंडी (१६%), मांस (२१%), मासे (१६%) हे जास्त ४२ टक्क्यापर्यंत आहे. तसेच यांच्या किमतीची तुलना केल्यास सोयाबीन सगळ्यात स्वस्त आहे. सोयाबीन हे कमी किमतीत आवश्यक उच्च प्रतीचे प्रथिने मिळण्याचे एकमेव स्त्रोत त्यामुळे दिनंदिन आहारात सोयाबीन पासून विविध प्रकारचे पदार्थ तयार करून समावेश करणे हि सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली ठरू शकते.

आहारात सोयाबीन चा समावेश करताना पूर्वप्रक्रिया करूनच वापरावे. सोयाबीनच्या टरफलामध्ये ट्रीपसीन इनहीबिटर हा अपायकारक घटक असतो म्हणून वापरण्यापूर्वी सोयाबीन चे टरफल भाजून, भिजवून, उकळवून काढणे आवश्यक भिजवतांना सोयाबीन नेहमी १:३ या प्रमाणात (१ किलो सोया ३ ली.पाणी) भिजवावे.या प्रक्रियेमुळे ट्रीपसीन इनहीबिटर अकार्यक्षम होतो व सोयाबीन पचण्यास सुलभ होते.


घरगुती स्तरावर सोया दुध व पनीर (टोफू) बनविण्याची विधी

सोया दुध - १ किलो पूर्ण सोयाबीन (प्रक्रिया केलेली सोया डाळ असल्यास उत्तम) स्वच्छ करून १ टक्का सोडा बाय कार्ब (१० ग्राम खाण्याचा सोडा) टाकून ६ते८ तास भिजवणे. भिजलेले सोयबीन निथळून ठेवणे व मिक्सर मधून थोडे थोडे गरम पाणी घालून बारीक करणे. बारीक केलेल्या मिश्रणात ६-८ ली. गरम पाणी घालून मिश्रण १५ ते २० मि. गस वर उकळविणे. मलमलच्या कापडाने गाळून घेणे. खोलीच्या तापमानावर थंड करावे.




सोया सुगंधित दुध - सोया दुधात वेगवेगळे सुगंध व खाण्याचा रंग टाकून त्याची ग्राहकता व स्वीकार्यता वाढवू शकतो. थंड झालेल्या १ ली. सोयादुधात २.५ ग्राम मीठ, १२५ग्राम साखर चवीसाठी घालावी. नंतर आवडीप्रमाणे व्हानीला, इलायची, चोकलेट, सुगंध एक थेंब तसेच किंचित खायचा रंग मिसळावा.

१ किलो सोयाबीन पासून ६ ते ८ ली. दुध मिळते. एका कुटुंबाची रोजची १ ली. दुधाची गरज भागविण्यासाठी केवळ १२५ ग्राम सोयाबीन ची आवश्यकता आहे.

टिकवण काळ - सोया दुध हे रेफ्रिजरेटर मध्ये २ ते ३ दिवस ताजे राहू शकते.

पोषणमुल्य - १०० मिलि. सोया दूध मध्ये ३.०६ ग्राम प्रथिने आहेत तर गाईच्या दुधात ३.०२ ग्राम प्रथिने

आहेत दोघाचे प्रथिन प्रमाण जवळपास सारखेच आहे परंतु सोया दुधाच्या प्रथिना ची किमत फक्त ३० पैसे

तर डेअरी दुधाचे प्रथिन मुल्य ५ रुपये इतकी तफावत आहे.


सोया पनिर (टोफू ) - तयार झालेले साधे सोया दुध ७० डी. सें. पर्यंत गरम करावे. त्यामध्ये २ ग्राम प्रति लिटर प्रमाणे सायट्रिक असिड (लिंबू सत्व) टाकावे. दुध फाटल्यानंतर मलमल च्या कापडातून गळून घेणे. मिळालेल्या लगद्यास दाब यंत्र द्वारे २० मिनिट दाब द्यावा. सोया पनिर तयार झाल्यावर कापून थंड पाण्यात ठेवावे.

१ किलो सोयाबीन पासून बनविलेल्या ६ लिटर दुधापासून १.२०० किलो इतके पनिर प्राप्तः होते.



टिकवण काळ - खोलीच्या तापमानावर थंड पाण्यात ठेऊन सोया पनिर हे १२ तासापार्यात सुरक्षित राहू शकते. तसेच रेफ्रिजरेटर मध्ये भांड्यात पाण्यात डुबउन ३ ते ४ दिवसपर्यंत टिकू शकते.

पोषण मुल्य - १०० ग्राम सोया पनिर मधून १४ ग्राम प्रथिने तसेच १०२ कि. कॅलरी मिळतात. हे डेअरी पनिर इतकेच आहे. ग्राम पनिर प्रथिनांची किमत बघता ३.५० रुपयात १४ ग्राम प्रथिने मिळतात तर तेव्हड्याच प्रथिनांसाठी डेअरी पनिर साठी २२ते २५ रुपये द्यावे लागतात.


ओकारा - सोयाबीन चे दुध काढल्यानंतर राहिलेल्या चोथ्यास ओकारा असे म्हणतात १ किलो सोयाबीन पासून १.१ किलोग्राम इतका चोथा मिळतो. या ओकारा पासून हलवा, गुलाबजामून, ढोकळे, इडली, पकोडे असे विविध पदार्थ बनविता येतात यामध्ये १८ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.

ओकारा पकोडे विधी - १०० ग्राम ताजा ओकारा मध्ये ५० ग्राम बेसन घालून चाविप्रमाणे कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, तिखट, मीठ, धणे जिरे पूड घालावे. आवश्यकतेनुसार पाणी घेऊन मिश्रण एकत्रित चांगले फेटावे. कढई मध्ये तेल गरम करून तळून घ्यावे.



पोषण मुल्य - १०० ग्राम सोया पनिर मधून १४ ग्राम प्रथिने तसेच १०२ कि. कॅलरी मिळतात. हे डेअरी पनिर इतकेच आहे. ग्राम पनिर प्रथिनांची किमत बघता ३.५० रुपयात १४ ग्राम प्रथिने मिळतात तर तेव्हड्याच प्रथिनांसाठी डेअरी पनिर साठी २२ते २५ रुपये द्यावे लागतात.


ओकारा - सोयाबीन चे दुध काढल्यानंतर राहिलेल्या चोथ्यास ओकारा असे म्हणतात १ किलो सोयाबीन पासून १.१ किलोग्राम इतका चोथा मिळतो. या ओकारा पासून हलवा, गुलाबजामून, ढोकळे, इडली, पकोडे असे विविध पदार्थ बनविता येतात यामध्ये १८ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.


ओकारा पकोडे विधी- १०० ग्राम ताजा ओकारा मध्ये ५० ग्राम बेसन घालून चाविप्रमाणे कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, तिखट, मीठ, धणे जिरे पूड घालावे. आवश्यकतेनुसार पाणी घेऊन मिश्रण एकत्रित चांगले फेटावे. कढई मध्ये तेल गरम करून तळून घ्यावे.

पोषणमुल्य - १०० ग्राम पाकोडे मध्ये ९ ते १० ग्राम प्रथिने व ३०० ते ३२० कि. कॅलरी मिळतात.

अश्या प्रकारे १ किलो सोयाबीन पासून ८ लिटर दुध त्यातील ६ लिटर दुधापासून १.२ किलो पनिर तसेच १.१ किलो ओकारा मिळून विविध पदार्थ बनून सोयाबीन चे सेवन करू शकतो व यातून १०० ग्राम दुध, पनिर व पकोडे मिळून एका व्यक्तीस २० ते २५ ग्राम प्रथिने अत्यंत अल्प किमतीत सहज प्राप्त होऊ शकतात.

card-grid-image
डॉ. प्रेरणा धुमाळ

सहाय्यक प्राध्यापक गृहविज्ञान , कृषि विज्ञान केंद्र, वर्धा