Translate to :  

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

शेतकऱ्यांसाठी वखार महामंडळाच्या योजना

                            

शेतकरी बांधवांनो, आपण आपले पीक, मग ते कोणतेही असो, सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, ऊस किंवा भाजीपाला, तो शेतात पिकल्यानंतर आपण त्याचे विक्रीची चिंता करायला लागतो. आता ऊस, भाजीपाला लगेचच विक्री करायला हरकत नाही. पण सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा व इतर कडधान्य अगदी भाजीपाल्यातीलही, काही भाजीपाला जसे की लाल मिरची आपण तात्काळ विक्री न केल्यास, काही काळ गोडाऊनमध्ये साठवून ठेवल्यास, आणि मग भाव वाढल्यानंतर त्याची विक्री केल्यास आपल्याला दोन पैसे जास्त मिळणार नाही का? चला तर मग बघूया वखार महामंडळाच्या आपल्या करिता असलेल्या योजना-

 

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची माहिती –


महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ सन १९५७ मध्ये अग्रीकल्चर प्रोड्युस (डेव्हलपमेंट अन्ड वेअरहाऊसिंग) कार्पोरेशन ॲक्ट १९५६ अन्वये स्थापना झालेले असुन संसदेने विशेष पारीत केलेल्या द वेअरहाऊसिंग कार्पोरेशन ॲक्ट १९६२ या कार्यान्वये शेतमाल व्यवस्थापनासाठी कार्यरत आहे.


·      ८ विभागीय कार्यालये (औरंगाबाद, अमरावती, कोल्हापुर, नागपूर, पुणे, लातुर, मुंबई, नाशिक)

·      द्रोणागिरी नोड येथे आयात व निर्यात (सीएफएस) केंद्र २०५ ठिकाणी वखारकेंद्रे ११७३ गोदामांचे जाळे, एकुण साठवणुक क्षमता २०.४० लाख मे.टन

·      शेतमाल साठवणुकीसाठी पनवेल येथे ५००० मे.टन मिरज येथे ८५६ मेयटन व सांगोला येथे ८४० मे.टनाचे शितगृह कार्यरत आहेत.

·      ५०% महाराष्ट्र शासन व ५०% केंद्रीय वखार महामंडळ समान भागीदार असुन प्रत्येकी ४.३५ कोटीप्रमाणे एकुण रु. ८.७१ कोटी भागभांडवल.


महामंडळातर्फे पुरविण्यात येणाऱ्‍या सुविधा –

·      शेतकऱ्‍यांना शेतमाल साठवणुकीवर वखारभाड्यात ५०% सवलत देण्यात येते.

·      शेतमालासाठी गोदामामध्ये २५% जागा आरक्षित करण्यात आली असुन शेतमाल साठवणुकीस प्राधान्य देण्यात येते.

·      प्रत्येक पंधरवड्यामध्ये शेतमाल सुरक्षित राहण्यासाठी किड प्रतिबंधात्मक व उपचारात्मक किटकनाशकांचा वापर करुन मालाची शास्त्रशुद्ध साठवणुक करण्यात येते.

·      महामंडळातील सर्व साठवणुकीला १००% विमा संरक्षण देण्यात येते याकरीता महामंडळाने राज्यातील सर्व गोदामे व साठवणुकीत असलेला राज्याच्या एकुण अंदाजित किंमत रु. ७,५००/- कोटीचा विमा घेतला आहे.

साठवणुक असलेल्या मालाचे नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई देण्यात येते.

·      ठेविदारांना दिलेली वखार पावती परक्राम्य लेख (Negotiable Instrument) आहे व ती बॅंकेकडे तारण ठेवुन ठेविदारांना बॅकेकडुन त्वरीत कर्ज मिळते.

·      गोदामाच्या ऑनलाईन सुविधामार्फत वखार पावती बॅंकाना देवुन त्यावर मालाच्या किमतीत ७५% इतकी रक्कम अल्प दराने तारण ऋण शेतकऱ्‍यांना तात्काळ मिळवुन देणे.

·      विविध संस्था, कंपनी तसेच व्यापारी यांचा औद्योगीक माल साठवणुकीसाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य सुविधा उपलब्ध करुन देते.

·      केंद्र/राज्य शासनाच्या आधारभुत हमी भाव खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केला जाणारा शेतमाल (मका, धान, ज्वारी, तुर, सोयाबीन इ.) महामंडळाची गोदामे ज्या ठिकाणी आहेत तेथे प्राधान्याने साठवणुक करण्यात येते.

·      मुंबई येथे आयात व निर्यातदारांना शुल्कबंध वखारीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते.

·      महामंडळाने पहिल्या टप्प्यात ७३ वखार केंद्राच्या आवारात क्लिनिंग अन्ड ग्रेडींग युनिट चालु केले आहे. त्याद्वारे धान्याची योग्य प्रकारे प्रतवारी ठरविले असता मुल्यवर्धन होवुन शेतमालास जादा दर मिळत आहे.

·     केंद्र शासनाच्या Warehousing Development and Regulatory Authority (WDRA) ह्याचे कडुन महामंडळाने १९५ वखार केंद्राचे रजिस्ट्रेशन पुर्ण झाले असुन, महामंडळाच्या ह्या कामगिरीबाबत देशात प्रथम क्रमांक

मिळाल्याने नवी दिल्ली येथे गौरव करण्यात आला आहे.


ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाईन तारण कर्ज योजना –

·      संगणकीय शेतमाल तारण कर्ज योजना (Block-Chain)

·      वखार महामंडळाकडुन Whrrl फिनटेक योल्युशन्स, ठाणे यांचे समवेत करारनामा करण्यात आला असुन सदर कराराचा कालावधी पाच वर्षाचा असुन दि. 01.08.2022 पासुन 31.07.2027 पर्यंत आहे.

·      सदर योजना राबविणारे अग्रगण्य महामंडळ.

·      सदर योजनेच्या अंमलबजावणीमुळे महामंडळास राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त.

·      सदर योजनेची वैशिष्ट्ये –


  •  शेतकऱ्‍याला बॅंकेकडे हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही.
  •  बॅंकेकडुन शेतमाल तारण कर्जाची मंजुरी व वितरण काही तासांमध्ये शक्य.
  • सदर योजनेमध्ये प्रायोगीक तत्वावर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक यांचेमार्फत शेतमाल तारण कर्ज उपलब्ध.
  • कर्जाचा व्याज दर ९% (दरसाल दर शेकडा)
  • शेतकऱ्यांकरीता वखारपावतीवर शेतमालाच्या मुल्यांकनाच्या 70% व कमाल रु. 10.00 लाख व शेतकरी उत्पादक कंपनी यांना कमाल रु. 75.00 लाख पर्यंत कर्जाचे वितरण मर्यादा.
  • कर्जाचे मंजुरी व वितरण २४ तासात


·      सध्यास्थितीत ५,४०६ शेतकऱ्‍यांना रु. १२५.१४ कोटी शेतमाल तारण कर्ज वितरीत.

·      दरसुची 58 (R) प्रमाणे अन्नधान्य गोदामात साठवणुकीचे भाडेदर


  •  शेतकऱ्‍यांनी चालु पिकांचा 7/12 चा उतारा दिल्यानतंर साठवणुक वखार भाडयात ५०% सवलत देण्यात येते.
  • शेतकरी उत्पादक कंपनी (FPCs)/शेतकरी उत्पादक संस्था(FPOs) यांनी सभासद नोंदणी प्रमाणपत्र व सभासद असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी शेतमालाच्या माहितीसह प्रथम आवकच्या वेळेस सादर केल्यास व एका कॅलेडर महिन्यात किमान 10 मे.टन शेतमाल साठवणूकीसाठी आवक झाल्यास साठवणुक वखार भाडयात २५% सवलत देण्यात येते.








card-grid-image
सुभाष पुजारी

विभाग प्रमुख, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, नागपूर विभाग, नागपूर