रामेती अमरावती
प्राचार्यांचे मनोगत
रामेती अमरावती हे अमरावती विभागाच्या म्हणजेच पश्चिम विदर्भाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी कार्यरत आहे. एके काळी विदर्भ ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था होती. "वऱ्हाड - सोन्याची कुऱ्हाड" हे विदर्भाच्या समृद्धीचे वर्णन करण्यासाठी वापरले जाणारे प्रसिद्ध वाक्य होते. सध्या हा प्रदेश शेतकरी आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तांत्रिक ज्ञानच नव्हे तर मानसिक आधार सुद्धा देण्याचे दुहेरी आव्हान कृषि व संलग्न व्यवसायातील विस्तार यंत्रणांपुढे आहे. प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) अमरावती या आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषि आणि संबंधित विभागांच्या क्षेत्र विस्तार यंत्रणांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे.