रामेती नाशिक
प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) नाशिक अंतर्गत कृषि विभागातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या 4 जिल्हंयाचा समावेश होतो. दिनांक 1 जून 1984 पासुन मृद संधारण प्रशिक्षण संस्था म्हणून कार्यरत असलेल्या संस्थेचे दिनांक 28 मे 1998 रोजी प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, रामेती, नाशिक म्हणून नवीन नामकरण झाले. नाशिक शहरात मध्यवर्ती बस स्थानकापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर संस्थेची इमारत असुन संस्थेचा परिसर सुंदर हिरवाईने नटलेला आहे.
प्राचार्याचे मनोगत
शासकीय सेवाकाळात चांगल्या कामगिरीसाठी तसेच कर्मचा-यांच्या क्षमता विकसित आणि बळकट करण्यासाठी प्रशिक्षणाचा मोलाचा वाटा आहे. प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) नाशिक, कृषि विभाग तसेच संलग्न क्षेत्रात कार्यरत शासकीय कर्मचा-यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे. तांत्रिक बाबींसोबत कृषि क्षेत्रात येणा-या नाविन्यपूर्ण कल्पना व उपक्रम, कार्यरत कर्मचारी प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतक-यांपर्यंत पोहचवण्यासाठी रामेती, नाशिक सातत्यपूर्ण कार्य करत असुन त्यामुळे भविष्यात कृषि क्षेत्रातील येणा-या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करणे शक्य होईल...
श्री. शिवाजी आमले, प्राचार्य, रामेती नाशिक