रामेती पुणे
प्राचार्याचे मनोगत
प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था; पुणे ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची वनामती, नागपुर यांचे अधिनस्थ कार्य करणारी प्रादेशिक प्रशिक्षण संस्था आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि संलग्न क्षेत्राच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे. रामेती, पुणे संस्था वर्षभर विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून प्रशिक्षणार्थींमध्ये अपेक्षित क्षमता विकसित करण्यास मदत करते. यामुळे प्रशिक्षणार्थीची कृषि क्षेत्रातील कामगिरी उंचावून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
कृषी विषयक नवनवीन तंत्रज्ञान, शासनाच्या योजना, उपक्रम याचे अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावर तसेच प्रशासकीय स्तरावर आत्मविश्वासाने काम करण्यासाठी मनुष्यबळ घडविण्यात रामेतीचे भरीव योगदान आहे.
परंपरागत शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असलेली शेती या दोन्हींचा समन्वय साधणे ही येत्या काळाची गरज आहे. लहरी निसर्ग, बदलत जाणारे पाऊसमान यावर तंत्रज्ञानाची मदत घेऊन मात करणे शक्य आहे. मात्र याकरिता अद्ययावत तंत्रज्ञान वापराच्या दृष्टीने शासकीय मनुष्यबळाचे क्षमतावर्धन करण्याचे महत्वाचे काम रामेतीचे असून सदर जबाबदारी रामेती, पुणे यशस्वीपणे पार पाडत आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये वनामती, नागपुर नेहमीच आमची मार्गदर्शक राहिली आहे.